जालन्यातील घटनेमुळे मलाही दु:ख: मुख्यमंत्री

बुलढाणा : जालन्यातील घटनेमुळे मलाही दु:ख झालं असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. बुलढाण्यातील शासन आपल्या दारी कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.

यावेळी त्यांनी विरोधकांवर टीकास्र डागलं. मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं की, “ज्या लोकांनी मराठा समाजाचा गळा दाबला तेच लोक आता गळा काढतायत’ अशा शब्दांत मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. जालन्यातील घटनेच्या पार्श्वभूमीवर बुलढाण्यातील शासन आपल्या दारी कार्यक्रमामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आला होता.

मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रक्रिया सुरु झाली असल्याची माहिती देखील यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे. “फक्त दाखवण्यसाठी आम्ही काम नाही करत.” जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सरकार आणि मी स्वस्थ बसणार नसल्याचं आश्वासन देखील यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.

🤙 8080365706