कास पठार रंगबिरंगी फुलांची उधळण करण्यास सज्ज

कास : जागतिक वारसास्थळ व विविधरंगी फुलांसाठी प्रसिद्ध असलेल्या कास पठारावर फुलांच्या रंगछटा बहरण्यास सुरुवात झाली असून, नैसर्गिक रंगीबेरंगी रानफुलांची उधळण सप्टेंबर महिन्यात पाहायला मिळणार आहे.

या पार्श्वभूमीवर कास पठार कार्यकारी समितीच्या वतीने यंदा हंगामाचा प्रारंभ विविध मान्यवरांच्या उपस्थितीत तीन सप्टेंबरपासून करण्यात येणार आहे. यंदा प्रत्येक गोष्टीसाठी असणारे वेगवेगळे शुल्क कमी करून दीडशे रुपयांत प्रवेश शुल्क, पार्किंगपासून पठारापर्यंत बस व इतर सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

🤙 8080365706