
मुंबई: मुंबईत सुरू असलेल्या भारत आघाडीच्या बैठकीचा आज दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. य़ा बैठकीत विरोधकांची रणनिती ठरत असतानाच राज्यातील महायुतीची वर्षा बंगल्यावर बैठक पार पडली. या बैठकीत एकूण तीन महत्वपूर्ण ठराव पारित करण्यात आले. यामध्ये दोन ठराव अभिनंदनाचे तर एक ठराव संकल्पाचा होता.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत या बैठकीला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, प्रहारचे बच्चू कडू, रासपाचे महादेव जानकर, रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत, जनसुराज्यचे विनय कोरे, बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जोगेंद्र कवाडे आदी नेते, मंत्री, खासदार, महायुतीतील विविध पक्षांचे नेते उपस्थित होते.