
सातारा: साताऱ्यातील माण येथे महिलेला भररस्त्यात लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल व्हिडीओवर व्हायरल झाला आहे. मुखमंत्री एकनाथ शिंदे यांचं मूळगाव ज्या सातारा जिल्ह्यात येतं त्या साताऱ्यातील माण मधील व्हिडीओवरून मिंधे सरकारवर टीका सुरू झाली आहे. हा व्हिडीओ शेअर करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहविभागावर टिका केली आहे.
सुप्रिया सुळे यांनी X वर म्हटलं आहे की, ‘व्हिडीओ अतिशय संतापजनक आणि दुर्दैवी आहे. गृहखात्याचा वचक कुठेही दिसून येत नाही. त्यामुळे महिलांवर अत्याचार करणाऱ्या प्रवृत्ती निर्ढावल्या आहेत. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी गृहमंत्र्यांनी आपल्या खात्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. महिलांना अशाप्रकारे मारहाण करणाऱ्या व्यक्तीवर तातडीनं कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे.’.