लूना 25′ चंं लँडर हे चंद्रावर क्रॅश

दिल्ली : रशियाची चांद्रमोहीम अयशस्वी ठरली असल्याची माहिती समोर आली आहे. ‘लूना 25’चंं लँडर हे चंद्रावर क्रॅश झालं आहे. रशियाची स्पेस एजन्सी रॉस्कॉस्मॉसने याबाबतची माहिती दिली.

यामुळे चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरणारा पहिला देश ठरण्याचं रशियाचं स्वप्न भंगलं आहे. सोमवारी (21 ऑगस्ट) लूना 25 हे चंद्रावर सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न करणार होतं. मात्र त्यापूर्वी शनिवारी यामध्ये काही तांत्रिक अडचणी समोर आल्या होत्या. यानंतर हा बिघाड दुरुस्त कऱण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र, त्यातच हे लँडर चंद्रावर कोसळलं असल्याचं रशियाने सांगितलं.