डॉ.शंकर अंदानी यांच्या सेवाभावी कामाची नोंद लंडन बुक ऑफ रेकार्ड मध्ये

अहमदनगर : येथील सनदी लेखपाल सी ए, डॉ. शंकर घनश्यामदास अंदानी यांनी केलेल्या विक्रमी कामाची नोंद लंडन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. त्यांनी २०२२-२३ या आर्थिक वर्षात मंदिर, मस्जिद, चर्च आदी ३६४ धार्मिक स्थळांचे सेवाभावाने केलेल्या कार्याची दखल या रेकॉर्डमध्ये घेण्यात आली आहे.

नुकतेच लंडन बुक ऑफ रेकॉर्ड’च्या अधिकृत संकेतस्थळावर त्यांच्या कामांची नोंद जाहीर करण्यात आली आहे. डॉ.शंकर अंदानी सीए असून, मागील अनेक वर्षांपासून समाजकार्य करीत आहे. त्यांनी मंदिर, मस्जिद, चर्च आदी धार्मिक स्थळांच्या ट्रस्टचे काम सेवाभवाने केले. त्यांनी केलेल्या या कामाची दखल लंडन बुक ऑफ रेकॉर्डने दखल घेतली आहे. या रेकॉर्डसाठी राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट कार्य व विक्रम करणारे अत्यंत मोजके व ठराविक व्यक्तींना संधी दिली जाते.

यासाठी त्यांच्या कार्याची पूर्णतः छाननी व तपासणी करून विक्रम यादीत नोंद करण्यात येत असते. अंदानी यांच्या रुपाने सामाजिक कार्याबद्दल लंडन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालेले ते पहिले व्यक्ती ठरले आहे. सीए शंकर अंदानी यांना काही महिन्यांपूर्वी युनायटेड नेशन अमेरिका राष्ट्राध्यक्ष कार्यालयाकडून मेडल ऑफ एक्लन्स (उत्कृष्ट सेवा कार्याचा) सर्वोच्च आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे. अंदानी यांना जवळपास दीड हजार राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. ते शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान व अहमदनगर महानगरपालिकेचे मागील चौदा ते पंधरा वर्षापासून कर सल्लागार म्हणून काम पाहत आहेत. अनेक शासकीय संस्था व बँकचे ते लेखापरीक्षक न करसल्लागार आहेत. या निवडीबद्दल डॉ.अंदानी यांचे अभिनंदन होत आहे.