उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार

कोल्हापूर : कोल्हापुरात शासकीय ध्वजारोहणानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

शहीद जवानांचे बलिदान व अपंगत्व प्राप्त सैनिकांप्रति उपमुख्यमंत्री पवार यांनी कृतज्ञता व्यक्त केली यावेळी त्यांच्या हस्ते वीरपत्नी श्रीमती पद्मा प्रशांत जाधव व अपंग सेवारत सैनिक अक्षय नंदकुमार केंगरे यांना ताम्रपट वितरण करण्यात आले. जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यामध्ये सन 2019-20 साठी अश्विनी मळगे- वेटलिफ्टींगमध्ये तर कु. आरती पाटील- बॅडमिंटन दिव्यांग खेळाडू. सन 2020-21 साठी कु. सोनल सावंत- पॉवरलिफ्टींग, कु. स्वाती शिंदे- कुस्ती, कु. अभिज्ञा पाटील- नेमबाजी, श्रीमती स्वप्नाली वायदंडे – सॉफ्टबॉल तर दिपक पाटील यांना जलतरण दिव्यांग खेळाडू म्हणून पुरस्कार वितरण करण्यात आला. कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांना उत्तम जीवरक्षक पदकाने गौरवण्यात आले. कोल्हापूर जिल्हा कारागृह (शहर) सन 2022-23 साठी प्रशंसनीय सेवेबद्दल कारागृह विभागाचे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र घोषित करण्यात आले.

यामध्ये तुरुंगाधिकारी चंद्रशेखर देवकर, सुभेदार रुपेंद्र कुंभार, कारागृह शिपाई रुपेंद्र कोळी, इजाज शेख, श्रीधर कुंभार विद्या ढेंबरे यांना गौरवण्यात आले. एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि सी.पी.आर. रुग्णालय व गंगा प्रकाश हॉस्पिटल या रुग्णालयांना तसेच विभागीय व्यवस्थापक किरण कुंडलकर, जिल्हा समन्वयक डॉ. रोहित खोलकुंबे व डॉ. रेणुका वेदुलेकर यांना प्रशस्तीपत्र देवून सन्मानित करण्यात आले. जिल्ह्यात मधाचे गाव, मधमाशी मित्र, रेशीम ग्राम व स्टार्टअप यात्रा यासारखे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवल्याबद्दल महात्मा गांधी नॅशनल फेलो संदेश जोशी यांना गौरविण्यात आले. शिष्यवृत्ती परीक्षा 2022-23 मध्ये राज्य गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले. इयत्ता 5 वी ग्रामीण विभागामध्ये आजरा तालुक्यातील वि.मं.सुळगाव शाळेचा विद्यार्थी बुशरा मुल्ला, राधानगरी तालुक्यातील केंद्र शाळा गुडाळचा विद्यार्थी विराजराजे मोहिते. इयत्ता 5 वी शहरी विभागामध्ये महाराणी लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूलची विद्यार्थिनी पूर्वा भालेकर तर लक्ष्मीबाई जरग विद्यालयातील विद्यार्थिनी शौर्या पाटील. इयत्ता 8 वी ग्रामीण विभागातील भुदरगड तालुक्यातील प.बा.पाटील हायस्कूल, मुदाळचा विद्यार्थी पार्थ पांडूरंग पाटील, संजय गांधी विद्यालय नागनवाडी येथील विद्यार्थी चैतन्य धोनुक्षे. इयत्ता 8 वी शहरी विभागातील म.न.पा. इचलकरंजीमधील तात्यासो मुसळे विद्यालय येथील विद्यार्थिनी श्रध्दा कामते व डी.के.टी.ई हायस्कूलमधील विद्यार्थिनी आर्या कामीरे यांना गौरविण्यात आले.