स्वातंत्र्य दिनासाठी १५ ऑगस्ट हाच दिवस का

१५ ऑगस्ट हा दिवस संपूर्ण देशभरात स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो हे सर्वांनाच माहीत आहे. पण, १५ ऑगस्टला असं नेमकं काय घडलं होतं हे फार कमी लोकांना माहीत आहे. भारताचा कारभार चालवणे ब्रिटीशांना परडवणारे नव्हते त्यामुळे १९४६ च्या दरम्यान त्यांनी भारतातून लवकरात लवकर निघून जाण्याचे प्रयत्न सुरु केले. यावेळी १९४६ साली ब्रिटनने भारताला स्वातंत्र्य बहाल करण्याची घोषणा केली.यानंतर ३० जून १९४७ रोजी ब्रिटिश संसदेने लॉर्ड माऊंटबॅटन यांना संपूर्ण सत्ता भारतीयांकडे हस्तांतरित करण्याचे निर्देश दिले. लॉर्ड लुईस माऊंटबॅटन हे ब्रिटिश सरकारमधील अतिशय महत्त्वाचे अधिकारी होते. ज्यांनी दोन्ही जागतिक महायुद्धात महत्त्वाची भूमिका बजावली होती. यावेळी भारताच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटीश सरकारने भारतीय नेत्यांसह चर्चा करण्यासाठी माऊंटबॅटन यांना भारतात पाठवले.भारतीय स्वातंत्र्य विधेयक मांडले होते. या विधेयकाला १८ जुलै १९४७ ब्रिटिश संसदेने तत्काळ मंजुरी दिली. या विधेयकानंतर अखंड भारताची फाळणी झाली, यानंतर १४ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्री पाकिस्तान स्वतंत्र झाला आणि १५ ऑगस्टला भारत हा एक देश अस्तित्वात आला.