कोल्हापुरात 15 ऑगस्ट ला ‘यांच्या’ हस्ते ध्वजारोहण

कोल्हापूर : 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर कोणत्या जिल्ह्यात कोणते मंत्री ध्वजारोहण करणार? याबाबत आता सरकारकडून माहिती देण्यात आली आहे.

त्यामुळे कोणत्या जिल्ह्यात कोण ध्वजारोहण करणार याबाबत स्पष्टता आली आहे. 28 जिल्ह्यांमध्ये मंत्री ध्वजारोहण करणार आहेत, तर 7 जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी ध्वजारोहण करतील. राष्ट्रवादीचा अजित पवार गट शिंदे फडणवीस सरकार मध्ये सहभागी झाला तरी अजूनही पालकमंत्री पदाचा पेज सुटलेला नाही.गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या पालकमंत्री पदाचे वाटप अजूनही झालेले नाही.

कोल्हापुरात 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण कोण करणार याची उत्सुकता लागली होती. याबाबत आता स्पष्टता मिळाली असून कोल्हापुरात थेट उपमुख्यमंत्री अजित पवार हेच 15 ऑगस्ट दिनी ध्वजारोहण करणार आहेत. कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर हे सिंधुदुर्ग येथे ध्वजारोहण करणार आहेत तर हसन मुश्रीफ हे सोलापूर मध्ये ही जबाबदारी सांभाळणार आहेत. चंद्रकांत दादा पाटील हे पुण्यात ध्वजारोहण करतील. यामुळे कोल्हापुरातून या तिघांचा पत्ता कट होऊन उपमुख्यमंत्री अजित पवारच कोल्हापुरात ध्वजारोहण करतील.