
कोल्हापूर : सौदी अरेबिया येथील पवित्र मक्का आणि मदिना या शहरात यावर्षी हज यात्रेसाठी जाऊन आलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील स्त्री पुरुष हज यात्रेकरूंचा हज फाउंडेशन कोल्हापूर आणि लिम्रास चॅरिटेबल ट्रस्ट कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने येथील दसरा चौकातील मुस्लिम बोर्डिंग हॉल मध्ये मंगळवारी सकाळी 11 वाजल्यापासून सायंकाळी 4 वाजेपर्यंत स्वागत समारंभ कार्यक्रम पार पडला.

यावेळी जिल्ह्यातील सर्व हज यात्रेकरू उपस्थित होते.या यात्रेकरूंनी त्यांच्या यात्रेदरम्यान आलेल्या बऱ्या वाईट अनुभवाचे कथन केले.त्यांचे हे अनुभव हज फाउंडेशन आणि लिम्रास चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने हज कमिटी ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र राज्य हज कमिटी कडे सादर केले जाणार आहेत.
जेणेकरून पुढच्या वर्षी केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने याबाबत काही धोरणात्मक निर्णय घेऊन पुढील काळात जाणाऱ्या हज यात्रेकरूंना त्रासदायक होणार नाहीत अशा सुविधा निर्माण करण्यासाठी सहकार्य होईल. यावेळी मौलाना मन्सूर कासमी यांनी हज यात्रेकरूंना पुढील आयुष्यात कसे जीवन जगावे याबाबत मार्गदर्शन केले.तसेच मर्कज प्रमुख हाजी दिलावर मुल्लाणी यांनी सुद्धा हाजी लोकांना मार्गदर्शन केले.हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी लिम्रास चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष हाजी इक्बाल देसाई,हज फौंडेशनचे अध्यक्ष समीर मुजावर,हाजी बालेचांद म्हालदार, हाजी कय्युम बागवान,हाजी बाबासाहेब शेख,हाजी नूर मुजावर,हाजी इम्तियाज बारगीर,असिफ पैलवान, हाजी अस्लम मोमीन, समीर पटवेगार, हाजी इम्तियाज बागवान, फारुख अत्तार, इम्रान अत्तार,कलीम खान,यासीन उस्ताद यांनी विशेष प्रयत्न केले.
