
मुंबई : पश्चिम – पूर्व द्रुतगतीमार्गावरचे टोल बंद करण्याची मागणी शिवसेना नेते युवा सेना अध्यक्ष आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे. मुंबईतील रस्त्याची दुरुस्ती आणि देखभाल मुंबई पालिकेकडे, मग टोलचे पैसे एमएसआरडीसी कडे का, असा सवाल शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

एमएमआरडीएने मुंबई महानगरपालिकेला वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे आणि इस्टर्न एक्स्प्रेस हायवे मेंटन्सनसाठी दिले आहेत. मग तिथे टोल वसुली का केली जाते? हा टोल एमएसआरडीसी का घेत आहे? जर हे दोन महत्वाचे रस्ते बीएमसीकडे हस्तांतरित केले आहेत तर, मग टोलचे पैसे एमएसआरडीसीकडे का जात आहेत? असे विविध सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केले आहेत.
