डॉ.शंकर अंदानी यांना इंदोर येथे राष्ट्रीय स्तरावरील भारतश्री अवॉर्ड प्रदान..

कोल्हापूर : अहमदनगर नगर येथील सनदी लेखापाल व सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेले सनदी लेखापाल डॉ.शंकर अंदानी यांना अत्यंत प्रतिषठेचा राष्ट्रीय स्तरावरील भारतश्री अवॉर्ड समारंभपुर्वक नुकताच प्रदान करण्यात आला. या सोहोळ्यास प्रमुख अतिथी म्हणून एअर व्हाईस मार्शल समीर विश्वनाथराव बोराडे, प्रमुख सेलिब्रेटी बॉलीवूड स्टार मुस्ताख खान,विशेष पाहुणे म्हणून इंडियन आर्मीचे लेप्टनंट जनरल बी.एस. सिसोदिया आदी मान्यवर उपस्थित होते.

इंदोर येथील पंचतारांकित हॉटेल वाऊ मध्ये सदर समारंभ संपन्न झाला. अहमदनगर येथील सनदी लेखपाल सीए शंकर घनश्यामदास अंदानी यांनी केलेल्या विक्रमी कामाची नोंद देशातील प्रसिद्ध इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. त्यांनी 2022-23 या आर्थिक वर्षात मंदिर, मस्जिद, चर्च आदी 364 धार्मिक स्थळांचे सेवाभावाने केलेल्या कार्याची दखल या रेकॉर्डमध्ये घेण्यात आली आहे. नुकतेच इंडिया बुक ऑफ रेकॉर्डच्या अधिकृत संकेतस्थळावर त्यांच्या कामाची नोंद जाहीर करण्यात आली आहे. शंकर अंदानी सीए असून, मागील अनेक वर्षापासून समाजकार्य करीत आहे. त्यांनी मंदिर, मस्जिद, चर्च आदी धार्मिक स्थळांच्या ट्रस्टचे काम सेवाभावाने केले. त्यांनी केलेल्या या कामाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने दखल घेतली आहे. या रेकॉर्डासाठी राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट कार्य व विक्रम करणारे अत्यंत मोजके व ठराविक व्यक्तींना संधी दिली जाते. यासाठी त्यांच्या कार्याची पूर्णत: छाननी व तपासणी करून विक्रम यादीत नोंद करण्यात येत असते. अंदानी यांच्या रुपाने सामाजिक कार्याबद्दल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालेले ते पहिले व्यक्ती ठरले आहे.

सीए शंकर अंदानी यांना काही महिन्यांपूर्वी युनायटेड नेशन अमेरिका राष्ट्राध्यक्ष कार्यालयाकडून मेडल ऑफ एक्सलन्स (उत्कृष्ट सेवा कार्याचा) सर्वोच्च आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे. अंदानी यांना जवळपास दीड हजार राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. ते शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान व अहमदनगर महानगरपालिकेचे मागील चौदा ते पंधरा वर्षापासून कर सल्लागार म्हणून काम पाहत आहेत. अनेक शासकीय संस्था व बँकचे ते लेखापरीक्षक व कर सल्लागार आहेत.

🤙 8080365706