जिल्ह्यातील 17 बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर: जिल्ह्यात सुरु असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील 17 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

पंचगंगा नदीवरील – शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ.भोगावती नदीवरील – तारळे, हळदी, राशिवडे, सरकारी कोगे व खडक कोगे.वारणा नदीवरील – चिंचोली व तांदूळवाडी.दुधगंगा नदीवरील – दत्तवाड कासारी नदीवरील – यवलूज व ठाणे आळवे असे 17 बंधारे पाण्याखाली आहेत. पाटंबधारे विभागाच्या आजच्या नोंदीप्रमाणे बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 25.2 फूट, सुर्वे 22.10 फूट, रुई 53 फूट, इचलकरंजी 50.6, तेरवाड 46.7 फूट, शिरोळ 39.6 फूट, नृसिंहवाडी 38.6 फूट, राजापूर 25 फूट अशी आहे.

🤙 8080365706