
बंगळूर : बारसू येथील रिफायनरी विरोधी आंदोलनाला बंगळुरू येथून पैसा पुरवला जातो असे सांगून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकणी जनतेला बदनाम केले आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस तुम्ही अरामको कंपनीचे दलाल आहात. तुमच्याकडे गृहखाते आहे मग सांगा बंगळुरूवरून पाठवलेले पैसे कोणत्या आंदोलकाच्या खात्यात जमा झाले? असा सवाल शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) सचिव आणि खासदार विनायक राऊत यांनी उपस्थित केला.

ते मराठा भवन येथे आयोजित केलेल्या रत्नागिरी शहर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या मेळाव्यात बोलत होते.विनायक राऊत पुढे म्हणाले की, भाजपचे मुंबईतील अजून एक उपटसुंभ नेते आहेत. ते म्हणतात शिवसनेनेमुळे रिफायनरी पाकिस्तानात गेली. ज़र शिवसेनेत एवढी ताकद असेल तर एक दिवस तुम्हालाही आम्ही सत्तेवरून हाकलवून लावू असा इशारा राऊत यांनी दिला.
