कोल्हापूरच्या राजाचे मोठ्या थाटामाटात आगमन

कोल्हापूर : गणेशोत्सव जवळ आला कि सर्वाना वेध लागतात ते गणरायाच्या आगमनाचे. मोठा उत्साहात व थाटामाटात हा सण साजरा केला जातो. त्यातच आज दिनांक ६ ऑगस्ट रोजी कोल्हापूरच्या राजाचे मोठ्या थाटामाटात आगमन झाले आहे.

रंकाळवेस गोल सर्कल मित्र मंडळाचे कार्यकर्ते हि मूर्ती आणण्यासाठी मुंबईला गेले होते. काल दुपारी तीनच्या दरम्यान विधिवत पूजा करून ते लाडक्या बाप्पासह कोल्हापूरकडे निघाले आणि आज सायंकाळी कोल्हापूरच्या राजाचे करवीर नगरीत जल्लोषी वातावरणात आगमन झाले. यासाठी जंगी तयारी करण्यात आली होती. सायंकाळी ५ वाजता तावडे हॉटेल येथून पारंपरिक वाद्यांच्या गजरात हा आगमन सोहळा पार पडणार पडला.

🤙 8080365706