
पाकिस्तान : पाकिस्तानमधे आज एक मोठा रेल्वे अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. शहजादपूर आणि नवाबशाह दरम्यान सहारा रेल्वे स्थानकाजवळ रावळपिंडीहून जाणाऱ्या हजारा एक्स्प्रेसचे 10 डबे उलटले.

या अपघातात किमान 50 लोक जखमी झाले. बचाव कार्यादरम्यान 15 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. बचावकार्य सुरू आहे. ही रेल्वे कराचीहून पंजाबकडे जात असताना अपघात झाला.
