आता मंत्रिमंडळ विस्तार झाला तर मी अमेरिकेला : बच्चू कडू

मुंबई : आता लवकरच पुढचा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावर अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. आता मंत्रिमंडळ विस्तार झाला तर मी अमेरिकेला जाईन. मी मंत्रिमंडळ विस्ताराला हजर राहणार नसल्याचं आमदार बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

त्याचबरोबर ‘आता सरकारने मंत्रिमंडळ विस्तार करू नये. आता जसं आहे तसं चालू ठेवावं. मंत्रिमंडळ विस्तार करुन विनाकारण चार लोकांना दुखवू नये, असा सल्ला बच्चू कडू यांनी राज्य सरकारला दिला आहे.सध्या सरकार चांगल्या पद्धतीने चालू आहे. आता जे मंत्री आहेत ते सक्षम आहेत, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर दिली आहे.

🤙 8080365706