
गडहिंग्लज: चित्री धरण 100% भरल्याने आजरा व गडहिंग्लज तालुक्यातील शेतकरी बंधू व जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा व शेतीचा प्रश्न सुटलेला आहे. चित्री पूर्णपने भरल्यामुळे आज (शनिवार) 5 आगस्ट रोजी आजरा गडहिंग्लज तालुक्यातील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या उपस्थितीत चित्रीचे पाणी पूजन करण्यात आले.

सदर कार्यक्रम प्रसंगी आजरा तालुक्यातील ज्येष्ठ नेते विष्णुपंत केसरकर तसेच वीरशव बँकेचे व्हाईस चेअरमन सदानंदअण्णा हत्तरगी हिरा शुगरचे संचालक सोमगोंडा आरबोळे , जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सतीश पाटील, कोल्हापूर गोड साखर संचालक प्रकाश भाई पताडे, विद्याधर गुरवे ,गोड साखर संचालक रमेश पाटील तालुका संघ व्हाईस चेअरमन राकेश पाटील, तालुका राष्ट्रवादी युवक अध्यक्ष चंद्रकांत जागनूरे,माजी संचालक गोड साखर भीमराव राजाराम, माजी सरपंच जकेवाडी शिवाजी राणे, आदित्य पाटील व नितीन पाटील आदींच्या प्रमुख उपस्थितीत पाणी पूजन करण्यात आले.
