देश उभा करण्याचे काम गांधी व नेहरू कुटुंबाचे: आमदार पी.एन.पाटील

बालिंगा/ मोहन कांबळे

कोल्हापूर : राहुल गांधी यांच्यावर दाखल केलेल्या केसेस बद्दल सुप्रीम कोर्टाकडून स्थगितीचा दिलासा मिळाल्यामुळे पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. त्याचबरोबर फुलेवाडी येथील अमृत मल्टीपर्पज हॉलमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा आज दुपारी आयोजित केला होता. त्याप्रसंगी आमदार पी. एन.पाटील बोलत होते. त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास नारायण पाटील हे होते. यावेळी पुढे बोलताना आमदार पी. एन. पाटील यांनी गांधी व नेहरू घराण्याचे या देशाच्या विकासाबद्दल किती योगदान आहे. याचे सविस्तर कथन करताना विद्यमान सरकारवर ताशेरे ओढले विद्यमान सरकारने देशातील 23 कंपन्या विकाव्याचे काम नव वर्ष झाले भाजप सरकार करीत आहे. आणखी सात कंपन्या खाजगी मालकाने विकायचे काम या ठिकाणी चालू असून पेट्रोलियम कंपन्या व गोरगरिबांची रेल्वे विकण्याचे काम देशात चालू असल्याचे नमूद केले.

त्याचबरोबर राहुल गांधी यांनी कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत रस्त्यावरून चालत जात रस्त्यावर आणि ट्रेक मध्ये झोपून गोरगरीब सामान्य माणूस दलित माणूस यांना जवळ घेऊन मिठी मारून त्यांच्या अडचणी काय आहेत असे विचारून सारा देश समजून घेण्याचे काम त्यांनी या ठिकाणी केल्याचे नमूद केले. तसेच राहुल गांधी यांचे सर्व शिक्षण प्रदेशात झाल्याचेही त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमास हजारो काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. बऱ्याच वक्त्यांनी आपल्या भाषणामध्ये सविस्तर विवेचन करताना सांगितले की राहुल गांधी यांच्या शिक्षेला कालच स्थगिती मिळाली आणि आजच मेळावा घेणारे देशातील महाराष्ट्रातील एकमेव आमदार म्हणजे पी. एन. पाटील हे आहेत असे नमूद करून त्यांनी पी.एन. पाटील यांचे अभिनंदन केले. यावेळी विश्वास नारायण पाटील, उदय पाटील कौलवकर ,भारत पाटील ,बाजीराव खाडे, बाळासाहेब खाडे इत्यादी वक्त्यांची भाषणे झाली.

कार्यक्रमास भारत पाटील भुयेकर, बाळासाहेब खाडे, बाजीराव खाडे, उदय पाटील कौलवकर, संभाजी पाटील, शंकराव पाटील ,जयसिंग खेडेकर, राहुल पाटील, राजू सूर्यवंशी ,सुप्रिया साळुंखे, सविता पाटील, शिल्पा पाटील ,शशिकला रोटे, सुशील पाटील कौवलवकर ,सर्जेराव पाटील, यशवंत बँकेचे आध्यक्ष एकनाथ पाटील, उदय पाटील, सर्जेराव पाटील,अनिल पवार, रघुनाथ कांबळे बालिंगेकर, भिमराव कांबळे,तसेच भोगावतीचे सर्व संचालक ,श्रीपत दादा बँके सर्व संचालक, राजावजी सुतगिरणीचे सर्व संचालक व करवीर पन्हाळा राधानगरी येथील काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी राधानगरीचे सरपंच संघटनेचे अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल धीरज डोंगळे यांचा सत्कार आमदार पी.एन. पाटलांच्या हस्ते करण्यात आला. या ठिकाणी “राहुल गांधी आगे बढो हम तुम्हारे साथ है” या घोषनेने सरा परिसर दणाणून गेला होता. जमलेल्या सर्व कार्यकर्त्यांना स्वतः आमदार पी.एन.पाटील यांनी पेढे भरून हा आनंद उत्सव साजरा केला.

🤙 8080365706