चित्रपट महामंडळाने मानले राजेश क्षीरसागर यांचे आभार

कोल्हापूर : समस्त कलाकार बांधव आणि जनतेच्या भावनांचा आदर ठेवून जयप्रभा स्टुडीओ जागेचा प्रश्न मार्गी लावल्या बद्दल अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या वतीने राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचे आभार मानण्यात आले.

यावेळी चित्रपट महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी राजेश क्षीरसागर यांना पेढा भरवून आनंद साजरा केला. यावेळी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे मिलिंद आष्टेकर, महेश पन्हाळकर, आकाराम पाटील, बाळा जाधव, अमर मोरे, रविंद्र बोरगांवकर, इम्तियाज बारगीर, सुनील मुसळे, विनायक झगडे आदी उपस्थित होते.

🤙 8080365706