
अनेकजण आरोग्य निरोगी राखण्यासाठी लेमन टी पितात. लेमन टी मुळे तुमची पचनसंस्था निरोगी राहून तुमच्या शरीरात उर्जा निर्माण होते व तुम्ही दिवसभर तजेलदार दिसता. याशिवाय, लेमन टी प्यायल्याने आणखी कोणकोणते फायदे होतात, हे आपण पाहुया.

सर्दी आणि तापासाठी उपयुक्त – लेमन टीमध्ये आलं टाकून दिवसातून ३-४ वेळा प्यायल्याने सर्दी बरी होते. तसंच घशाची खवखव किंवा खोकला बरा करण्यासाठीही लेमन टीचा उपयोग होतो. लेमन टीमध्ये मध घालून प्यायल्याने श्वसनाचे आजार होत नाहीत.
मानसिक स्थैर्यासाठी – लेमन टीमुळे पोट साफ राहतं. जीवनशैलीतील ताणतणावामुळे आपल्या शरीरात टॅाक्सिन्स वाढतात. त्यामुळे दिवसातून किमान एकदा तरी लेमन टी प्यायल्याने ताणतणावामुळे होणारी डोकेदुखी, थकवा, सुस्ती नाहीशी होते.
शरीरातील साखरेवर नियंत्रण – शरीरात इन्सुलिन्सचं प्रमाण वाढल्याने ब्लड प्रेशरचा त्रास वाढतो. त्यामुळे दिवसातून ३-४ वेळा लेमन टी प्यायल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहते व कोलेस्टरॉल कमी होते.
पचनसंस्थेचं शुद्धीकरण – लेमन टी प्यायल्याने पचनसंस्थेचं शुद्धीकरण होतं. लेमन टी मुळे शरीरातील टॅाक्सिन्स शरीराबाहेर पडतात. त्यामुळे पोटाचे कोणतेही विकार होत नाहीत. त्यामुळे पोटदुखी अथवा आतड्यांचे विकार असणाऱ्यांसाठी लेमन टी उपयुक्त असते.
