मणिपूर येथील महिला हिंसाचार विरोधात युवती सेनेचे मुक आंदोलन

कोल्हापूर : मणिपूर मध्ये झालेली घटना अत्यंत लाजिरवाणी आहे. त्या ठिकाणी महिलांवर झालेल्या हिंसाचाराचा निषेध नोंदवत मणिपूर येथील घटनेच्या विरोधात कोल्हापूर युवती सेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) वतीने शिवाजी चौक येथे मुख आंदोलन करण्यात आले.

यावेळी आंदोलन कर्त्यांच्या हातामध्ये लक्षवेधनारी बॅनर होती. या बॅनरवर असं लिहिण्यात आलं होतं की,56 इंच की छाती, महिलाओ की इज्जत बचाने काम नही आती. तसेच द्रोपदी का हर रोज हो रहा है वस्त्रहरण, क्योंकि शासन चला रहा है दुशासन असे लिहिलेले बॅनर येना-जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत होते. सदरचे आंदोलन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे . तसेच युवतीसेनेच्या संपर्क युवती अधिकारी अक्षया महाडिक तसेच कोल्हापूर जिल्हा युवती अधिकारी पूनम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झाले.

सदर आंदोलनात युवतीसेनेच्या उपजिल्हा युवती अधिकारी श्वेता सुतार, शहर अधिकारी सानिका दामूगडे, सिद्धी दामूगडे, उपशहर प्रिया माने. शहर चिटणीस राजश्री मिणचेकर. शहर समन्वयक काजल दुतांडे तसेच हातकणंगले तालुका अधिकारी ऋतुजा लोहार शिरोळ तालुका अधिकारी तेजश्विनी राजपूत आदि उपस्थित होत्या.

🤙 8080365706