लॅपटॉप कॉम्प्युटरच्या आयातीवर बंदी घालण्याचा निर्णय

दिल्ली : केंद्रातल्या मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला असून लॅपटॉप आणि कॉम्प्युटरच्या आयातीवर बंदी घातली आहे. या संदर्भात वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने एक अधिसूचना जारी केली आहे. डीजीएफटीनुसार, या इलेक्ट्रॉनिक वस्तू आयात करण्यासाठी आता परवानगी लागणार आहे.

सरकारच्या मेक इन इंडिया उपक्रमादरम्यान घेतलेला हा मोठा निर्णय आहे.वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने एक अधिसुचना जारी केली आहे. यानुसार लॅपटॉप, टॅबलेट, वैयक्तिक संगणक आणि अल्ट्रा स्मॉल फॉर्म फॅक्टर संगणक आणि सर्व्हरची आयात तत्काळ थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे चीनसारख्या देशातून होणारी आयात कमी होण्याची अपेक्षा आहे. यासोबतच या निर्णयामुळे देशात सातत्याने उत्पादन करणाऱ्या, स्थानिक पुरवठ्याला चालना देणाऱ्या आणि इतर देशांमध्ये निर्यात करणाऱ्या स्थानिक आणि परदेशी उत्पादकांना याचा फायदा होणार आहे.

🤙 8080365706