निसर्गकवी ना.धों. महानोर यांचे निधन

पुणे : महाराष्ट्रात ‘रानकवी’ आणि निसर्गकवी अशी ओळख असणारे आणि अनेक पिढ्यांना रानाची सफर आपल्या शब्दांच्या मार्फत घडवणारे ज्येष्ठ कवी ना.धों. महानोर यांनी गुरुवारी (3 ऑगस्ट 2023) रोजी अखेरचा श्वास घेतला.

ते किडनीच्या आजाराने त्रस्त होते. पुण्यातील रुबी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. तसंच त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. त्यांच्या निधनाने साहित्यकलाविश्वावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ना. धो. महानोर यांचं लिखाण हे निसर्गाशी नातं जोडणारं होतं. त्यांच्या कवितेतून निसर्ग बोलायचा इतकं सुंदर त्यांच्या गीतांचे बोल होते. ‘मी रात टाकली..मी कात टाकली’ ही त्यांच्या लोकप्रिय गीतांपैकीच एक रचना आहे. त्यांचा’रानातल्या कविता’ हा कवितासंग्रह खूप गाजला होता. त्याचबरोबर जैत रे जैत’, ‘सर्जा’ या आणि अशा अनेक चित्रपटांतील गीतं महानोरांनी रचली. स्वत: शेतकरी असल्याने निसर्ग, शेतीविषयी असलेलं प्रेम त्यांच्या कवितेतून झळकायचं. महानोरांच्या पार्थिवावर उद्या पळसखेड या त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

🤙 8080365706