निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज चंदनशिवे यांचा खून

सांगली  :  जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे.  सांगली येथील स्थानिक अन्वेषण (एलसीबी) निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज चंदनशिवे यांचा सांगोला तालुक्यातील वासुद येथे खून झाला.

यांच्यावर वारणा नगर (ता. पन्हाळा) येथील ९ कोटी रुपयांच्या चोरी प्रकरणाचा संशय होता. ही घटना आज (दि. ३) पहाटे उघडकीस आली आहे.सूरज चंदनशिवे  हे रात्री ११ वाजायच्या सुमारास वाॅकींग करण्यासाठी घराबाहेर पडले होते. बराच वेळ झाला तरी घर परत आले नाहीत म्हणून घरच्या लोकांनी त्यांच्या मोबाईवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो बंद येत होता.त्यानंतर घरच्या मंडळींनी त्यांची शोधाशोध सुरू केली. आज सकाळी सूरज चंदनशिवे यांचा सांगोला- वासूद रस्त्याच्या लगत अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने पाठीवर वार करून खून केल्याचे समोर आले. या भयंकर घटनेने सांगोल्यात खळबळ उडाली आहे.

🤙 8080365706