तुम्हाला माहित आहे का पाणी पिण्याची योग्य पद्धत?

पाणी हे शरीरासाठी गरजेचं असलं तरी चुकीच्या वेळी पाणी प्यायल्याने शरीराला त्याचं नुकसानही होऊ शकतं. यासाठीच पाणी पित असतानाही काही नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. तर जाणून घेऊया पाणी पिण्याची योग्य वेळ आणि योग्य पद्धती.

झोपण्यापूर्वी जास्त पाणी पिऊ नयेशरीर हायड्रेट रहावं यासाठी दिवसा पाणी पिणं कधीही योग्य. रात्री झोपण्यापूर्वी जास्त पाणी प्यायल्याने त्याचा किडनीवर परिणाम होवू शकतो. तसंच रात्री पाणी प्यायल्याने वारंवार लघवीला जावं लागल्याने त्याचा परिणाम झोपेवर होवू शकतो.तहान लागल्यावरच पाणी प्याकमी पाणी पिणं हे आरोग्यासाठी हानिकारक असलं तरी गरजेपेक्षा जास्त पाणी पिणं हे देखील शरीरासाठी नुकसानदायक ठरू शकतं. तहान लागली नसतानाही सतत पाणी प्यायल्याने ओव्हरहायड्रेशन आणि वॉटर इनॉक्सिनेशनची समस्या निर्माण होवू शकते. तसंच गरजेपेक्षा जास्त पाणी प्यायल्याने शरीरात सोडियमचं प्रमाण कमी होवू शकतं.

घाईत किंवा पटापटा पाणी पिणंघाईत किंवा पटापटा पाणी प्यायल्याने त्याचा पचनक्रियेवर परिणाम होतो. यामुळे अपचन आणि गॅसची समस्या निर्माण होवू शकते. तसचं जलद पाणी प्यायल्याने मूत्राशय आणि किडनीवरही परिणाम होवू शकतो. यासाठीच नेहमी हळू हळू एक एक घोट पाणी प्यावं.उभ्याने पाणी पिणंअसे अनेकजण असतात ज्यांना दिवसभरात अनेकवेळा उभ्याने पाणी पिण्याची सवय असते. मात्र उभ्याने पाणी प्यायल्याने त्याचा आरोग्यावर परिणाम होवू शकतो. उभ्याने पाणी प्यायल्याने त्याचा शरीरातील पाण्याच्या पातळीवर परिणाम होतो. यासाठी शक्य तेव्हा बसूनच पाणी प्यावं.

पाणी पिण्याची योग्य वेळ आणि पद्धत-दिवसभरामध्ये तहान लागल्यावर वेळोवेळी पाणी पिणं कधीही योग्य- खास करून सकाळी उठल्यानंतर २ ग्लास पाणी प्यायल्यास शरीर दिवसभर हायड्रेट राहण्यास मदत होते.- तसंच जेवणाच्या २० मिनटं आधी तुम्ही पाणी पिऊ शकता. तसंच जेवल्यानंतरही अर्धा ते पाऊण तासांनी पाणी प्या.- वर्कआउट सुरू करण्यापूर्वी तसंच वर्कआउट दरम्यान आणि वर्कआउट झाल्यावर तुम्ही पाणी पिऊ शकता.- झोपण्याच्या १ तास आधी पाणी प्या.- बाहेरून आल्यानंतर लगेचच पटापटा पाणी पिऊ नका तर काही मिनिटं बसून मग हळू हळू पाणी प्या.

🤙 8080365706