
मणिपूर : मणिपुर मध्ये उसळलेला हिंसाचार, महिला आणि सर्वसामान्यावर झालेल्या अनन्वित अत्याचार प्रकरणी सीबीआयने हिसाचार प्रकरणी 6 एफआय़आर दाखल केल्या आहेत.

आतापर्यंत सीबीआयने 10 जणांना अटक केली असून सातवी एफआयआर लवकरच दाखल केली जाईल असे सांगण्यात आले आहे.गेले 86 दिवस मणिपूर हिसाचाराच्या आगीत जळत आहे. मणिपूरमध्ये दोन महिलांची निर्वस्त्र करून धिंड काढण्यात आली आणि नंतर त्यांच्यावर सामूहीक बलात्कार करण्यात आला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. मणिपूरमध्ये या घटनेव्यतिरिक्त आणखीही काही महिलांवर अत्याचार करण्यात आले असून त्यातील काहींचे खून करण्यात आल्याचा आरोप समाजसेवी संघटनांकडून केला जात आहे.
