
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. पंचगंगा नदीला आता पुर आला असून पंचगंगा नदी आता इशारा पातळीकडे वाटचाल करत असल्यामुळे जिल्हा प्रशासन देखील अलर्ट मोडवर आले आहे.

नदीकाठच्या गावातील लोकांना आता जिल्हा प्रशासनाबरोबरच ग्रामपंचायतकडूनही वेळच स्थलांतरित होण्याचा सूचना दिल्या जातायेत. कोल्हापुरातील महापुराचा सर्वाधिक फटका बसणाऱ्या आंबेवाडी आणि चिखली गावात देखील स्थालातर होण्याच्या सुचना दिल्या गेल्या आहेत.

तर अनेक ठिकाणी पाणी गावात शिरण्याची शक्यता आहे. तर पुराचे पाणी अनेक ठिकाणी रस्त्यावर आल्यामुळे काही ठिकाणची वाहतूक ठप्प आहे. तर काही ठिकाणी याच पुराच्या पाण्यातून धोकादायक पद्धतीने प्रवास केला जात आहे.
