फ्रिजमध्ये कणिक ठेवून वापरत असाल तर सावधान

फ्रीजमध्ये ठेवलेली कणकेच्या पोळ्या खाल्ल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याचा धोका असतो. फ्रीजमध्ये ठेवलेले पीठ का वापरू नये ते जाणून घेऊया.

कधीकधी आपण एकदाच खूप पीठ मळून घेतो आणि ते फ्रीजमध्ये बरेच दिवस ठेवून वापरतो. ते खराब होऊ नये यासाठी आपण ते फ्रीजमध्ये ठेवतो खरं. पण पावसाळ्याच्या दिवसांत मळलेल्या पिठात बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता जास्त असते. काही अशा बॅक्टेरियामुळे फूड पॉयझनिंग होण्याची शक्यता जास्त असते. तसेच असे अन्न खाल्ल्यामुळे ॲसिडिटी आणि बद्धकोष्ठताही होऊ शकतो.

कमी तापमानात बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता असते. पावसाळ्यात लिस्टेरिया मोनोसाइटोजेन्स नावाच्या बॅक्टेरियामुळे गंभीर आजार होऊ शकतात. फ्रीजच्या कमी तापमानातही हा बॅक्टेरिया सहज वाढू शकतो. त्यामुळेच फ्रीजमध्ये कोणतीही वस्तू ठेवण्यापूर्वी ती स्वच्छ करणे महत्त्वाचे ठरते.

पावसाळ्याच्या दिवसात ताज्या कणकेचा वापर करणेच उत्तम ठरते. पण तुम्ही कणीक मळून ठेऊन त्याचाच वापर करणार असाल तर ती मळताना त्यात फार पाणी घालू नये. त्यामुळे कणीक लौकर खराब होऊ शकते. कणीक फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी एअर टाइट कंटेनर किंवा झिप लॉक बॅगचा वापर करावा.

🤙 8080365706