मराठा क्रांती स्वराज्य संघटना कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष पदाची माळ अखेर अविनाश शेलार यांच्या गळ्यात

कोल्हापूर : मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले राष्ट्रीय अध्यक्ष उज्वलसिंह राजे गायकवाड राष्ट्रीय सरचिटणीस सुरत येथील उद्योजक विजयराव कदम यांच्या सुचनेनुसार राष्ट्रीय ज्येष्ठ उपाध्यक्ष तथा संस्थापक सदस्य प्रदीप मोरे यांनी ही घोषणा केली.

या वेळी बोलताना राष्ट्रीय उपाध्यक्ष ऍड आनंदराव भोसले यांनी सांगितले अविनाश शेलार एक समाजातील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहे विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती यांना त्यांनी आपलेसे केले आहे.

पुढारी टाईम्स बावडा या वृत्तपत्रातून सामाजिक बांधिलकी जपली आहे भ्रष्टाचार व अत्याचार विरोधी जन आंदोलन सक्रिय सहभाग घेवुन हिरीरीने पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक आंदोलने यशस्वी केली. ते सुविद्य असुन एम. ए पर्यंत शिक्षण झाले असून बॅचलर ऑफ सोशल मीडिया अँड जर्नालिझम आहेत. त्यांच्या निवडीची घोषणा होताच देशभरातून पदाधिकारी कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले. असुन राष्ट्रीय महिला अध्यक्षा प्रा. सौ. संध्या राणे कोकण प्रदेश अध्यक्ष निवृत सहाय्यक पोलिस आयुक्त विनोदराव चव्हाण, ज्येष्ठ समाज नेते गुरुनाथ यशवंतराव राष्ट्रीय सल्लागार अशोकराव मोरे नगर जिल्हा अध्यक्ष दिपक धट पाटील, पुणे जिल्हा अध्यक्ष सुरेशशेठ शेजवळ, पुणे जिल्हा महीला अध्यक्षा सौ वैशाली गलगटे आदी सह मान्यवरांच्या अभिनंदन केले आहे.

🤙 8080365706