
कोल्हापूर : राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात दोन ते तीन महिला आमदारांना स्थान मिळावे, असा आग्रह पक्षाकडे धरल्याचे आणि पक्षानेही याला मान्यता दिली असून या पुढच्या विस्तारात मंत्रिमंडळात महिला मंत्री दिसतील, असे भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आणि महिला आघाडीच्या प्रमुख चित्रा वाघ यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

महिला आघाडीच्या संघटनात्मक कामासाठी चित्रा वाघकोल्हापूरात आल्या होत्या. सकाळी अंबाबाईचे दर्शन घेउन त्यांनी कामाला सुरुवात केली. जिल्ह्यातील महिला कार्यकर्त्यांची त्यांनी रविवारी भेट घेतली. भाजप कार्यालयात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी, वाघ म्हणाल्या, पक्षात महिलांना नेहमीच प्राधान्य दिले जाईल. आगामी निवडणुकातही महिला मोठ्या संख्येने सहभागी होतील. आजही विधानसभा आणि विधानपरिषदेत पक्षाच्या सर्वाधिक महिला आमदार आहेत, त्या उत्तम काम करतील.
