धक्कादायक…मणिपूरध्ये ६००० गुन्हे , ७० लोकांचे खून तर पाच महिला लैंगिक अत्याचाराच्या बळी….

मणिपूर : मणिपूरमधील हिंसाचारानं आक्राळ-विक्राळ रूप धारण केलं आहे. दोन महिलांवरील अत्याचाराच्या व्हायरल व्हिडिओनं खळबळ उडाली असतानाच आता आणखी धक्कादायक माहिती पुढं आली आहे.मागच्या तीन महिन्यातील हिंसाचार व अत्याचाराची ही माहिती अक्षरश: सुन्न करणारी आहे.मणिपूरच्या हिंसाचाराच्या संदर्भातील एका अहवालानुसार, ३ मे पासून राज्यात उसळलेल्या हिंसाचारात अपरिमित जीवितहानी व अत्याचार झाले आहेत. वित्तहानीची तर मोजदादच नाही. आतापर्यंत राज्यात सुमारे ६ हजार गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. राज्यभरात ७० हून अधिक लोकांचे खून झाले आहेत. तर, किमान ५ महिला लैंगिक अत्याचार व बलात्काराच्या बळी ठरल्या आहेत, असा दावा काही आमदारांनी केला आहे.

गुन्हे ६ हजार, कारवाई फक्त ६५७ जणांवरआरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील कुकी आणि मैतेयी समाजात हिंसक संघर्ष सुरू आहे. त्यात आतापर्यंत किमान ६ हजार गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात ७० गुन्हे खुनाचे आहेत. इम्फाळ खोरे आणि लगतच्या डोंगराळ भागातून पोलिसांनी आतापर्यंत एकूण ६५७ जणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.मणिपूरच्या हिंसाचाराच्या संदर्भातील एका अहवालानुसार, ३ मे पासून राज्यात उसळलेल्या हिंसाचारात अपरिमित जीवितहानी व अत्याचार झाले आहेत. वित्तहानीची तर मोजदादच नाही. आतापर्यंत राज्यात सुमारे ६ हजार गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. राज्यभरात ७० हून अधिक लोकांचे खून झाले आहेत. तर, किमान ५ महिला लैंगिक अत्याचार व बलात्काराच्या बळी ठरल्या आहेत, असा दावा काही आमदारांनी केला आहे.

गुन्हे ६ हजार, कारवाई फक्त ६५७ जणांवर

आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील कुकी आणि मैतेयी समाजात हिंसक संघर्ष सुरू आहे. त्यात आतापर्यंत किमान ६ हजार गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात ७० गुन्हे खुनाचे आहेत. इम्फाळ खोरे आणि लगतच्या डोंगराळ भागातून पोलिसांनी आतापर्यंत एकूण ६५७ जणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.बलात्कार आणि महिलांचे खूनमणिपूर विधानसभेच्या दहा आमदारांनी महिलांच्या विरोधातील गुन्ह्यांची आकडेवारी दिली आहे. राज्याच्या विविध भागांत आतापर्यंत किमान ५ महिलांची हत्या झाल्याचा त्यांचा दावा आहे. अनेक महिला बलात्काराच्या बळी ठरल्या आहेत. मात्र, त्याचा तपशील आमदारांनी दिलेला नाही.दोन महिलांची विवस्त्र धिंडमणिपूरमध्ये समाजकंटकांनी महिलांची निर्वस्त्र धिंड काढल्याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ सोशल प्लॅटफॉर्मवरून हटवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शेकडो लोकांच्या जमावानं दिवसाढवळ्या महिलांवर अत्याचार केले. ही सगळी भयंकर कृत्य व्हिडिओतून समोर आली आहेत.

या प्रकरणी मुख्य आरोपींसह ४ जणांना अटक करण्यात आली आहे.अनेक प्रकरणांची चौकशी सुद्धा नाही!मणिपूरमध्ये आयएएस दर्जाचे २ हजार अधिकारी असून त्यांना गुन्ह्यांचा तपास करण्याचा अधिकार आहे. मात्र, बहुतांश प्रकरणांचा तपासही सुरू झालेला नाही. जवळपास ७५ प्रकरणं दररोज येत आहेत, परंतु तपासासाठी कर्मचारीच नाहीत. जे काही पोलीस कर्मचारी आहेत ते कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या कामात आहेत, असं अहवालातून समोर आलं आहे.सामाजिक अडचणमणिपूरचा सध्याचा संघर्ष सामाजिक प्रश्नातून निर्माण झालेला आहे. त्यामुळं पोलिसांनाही कर्तव्य बजावताना अडचणी येत असल्याचं समोर आलं आहे. ‘एका समुदायाचं वर्चस्व असलेल्या परिसरात दुसऱ्या समुदायाच्या पोलिसांना पाठवता येत नाही, असं एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं. एखाद्या आरोपीला पकडलं तरी त्याच्या समाजाचे लोक त्याला बळजबरीनं सोडवून घेऊन जातात. इम्फाळमध्ये एकच कायमस्वरूपी तुरुंग आहे. त्यामुळं देखील पोलिसांची अडचण झाली आहे.

🤙 8080365706