पावसाळ्यात कुरकुरीत पदार्थ खराब होऊ नयेत यासाठी घरगुती उपाय

पावसाळ्यात कुरकुरीत पदार्थ फार लवकर मऊ होतात आणि त्यानंतर त्यांना खाणे कठीण होते त्यामुळे आज आम्ही या समस्येवर काही घरगुती उपाय सांगणार आहोत.

पावसाळ्याच्या दिवसात अनेकदा खाण्याचे पदार्थ प्लास्टिकच्या डब्यात स्टोर केले जातात . मात्र या दिवसात प्लास्टिकच्या डब्याऐवजी काचेच्या भांड्यांचा वापर करावा. काचेच्या बरणीत स्नॅक्स ठेवल्याने ते दीर्घकाळ ताजे आणि कुरकुरीत राहण्यास मदत होते. जर तुम्हाला खाण्यापिण्याची खूप आवड असेल तर या गोष्टी काचेच्या बरणीत साठवून ठेवा. उदा. चिप्स, बिस्किट, फरसाण, चिवडा.या दिवसामध्ये ओलावा अधिक असल्याने नेहमी स्नॅक्स ओलसर ठिकाणांपासून दूर ठेवा.

स्नॅक्स ओलसर ठिकाणी ठेवल्यास ते लवकर मऊ होऊ लागतात आणि नंतर त्यांना खाण्याची मज राहत नाही. बरेच लोक फरसान डब्यात टाकतात आणि जमिनीवर ठेवतात. असे करणे टाळा. नेहमी स्नॅक्स कोरड्या ठिकाणी टेबलवर किंवा डायनिंगवर ठेवावे.

अनेकदा बरणीत ठेवलेले स्नॅक्स काढण्यासाठी बरणी उघडली जाते पण लवकर बंद केली जात नाही. अशी बरणी जास्त वेळ उघडी ठेवल्याने काही वेळा गोष्टी बिघडू लागतात. बरणी जास्त वेळ उघडी राहिल्याने त्यात हवा जाते आणि आतिल पदार्थ मऊ पडतात.

🤙 8080365706