
शाहूवाडी : आधार केंद्रामुळे नागरिकांना पंचायत समिती मध्येच आधार नवीन नोदंणी व आधार कार्डमध्ये आवश्यक बदल करून घेणेची सुविधा मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांचा वेळ ,पैसा वाचणार आहे. असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी या आधार केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी सांगितले.

शाहूवाडी पंचायत समिती येथे आधार केंद्राचे उद्घाटन प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मा संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते झाले . यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप ) अरुण जाधव, संयोगिता चव्हाण,गटविकास अधिकारी अलमास सय्यद ,विस्तार अधिकारी ए. एस. कटारे ,कक्ष अधिकारी संजय अवघडे ,विस्तार अधिकारी पी एस हेरवाडे,जिल्हा व्यवस्थापक नितीन मोहिते तसेच इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते .
