
मुंबई : अनधिकृत शाळांची संख्या पाहता याबाबत कोणते रॅकेट आहे की, काय असा प्रश्न पडतो त्यामुळे या प्रकरणी एसआयटी नियुक्त करुन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपा आमदार आशिष शेलार यांनी आज विधानसभेत केली.

राज्यात शिक्षण विभागाने केलेल्या पाहणीमध्ये १३०० पैकी ८०० शाळा या कागदपत्राती तृटींमुळे अनधिकृत ठरल्याची बाब निदर्शनास आल्याबाबत तारांकीत प्रश्न विधानसभेत उपस्थित करण्यात आला होता. याबाबत उत्तर देताना शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी सांगितले की, ६६१ खाजगी शाळा या अनधिकृत असल्याचे दिसून आल्या असून, अशा अनधिकृत शाळांवर कारवाई, दंड आणि फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश शासनाने दिल्याचेही मंत्र्यांनी सांगितले.
