
कोल्हापूर: शहरासह जिल्ह्यात पाऊस धुमाकूळ घालत आहे. यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे.

पंचगंगा नदीची पाणी पातळी आज सकाळी ७ वाजता ३१ फूट ६ इंचावर गेली आहे. कोल्हापूर शहरातील पंचगंगा घाट येथे पाणी पात्रा बाहेर पडल्याने आजूबाजूच्या परिसरात पाणी शिरत आहे. तर येथे आता पाणी बघण्यासाठी नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे. मात्र, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी येथे पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
