
उंचगाव : उंचगाव मुख्य प्रवेशद्वाराजवळ छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीजवळ भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या हे केंद्रीय सुरक्षा यंत्रणेला हाताशी धरून महिलांचे शोषण करतात व महाराष्ट्रातील महिलांबद्दल अपशब्द काढल्या निषेधार्थ करवीर शिवसेनेच्या वतीने किरीट सोमय्या यांच्या पोस्टरवर काळेफासत त्याला उलटा करून चपलाने मारत त्याला अक्षरशा तुडवले शिवसैनिक आक्रमक झाले होते.

यावेळी बोलताना राजू यादव म्हणाले की, केंद्रीय यंत्रणा हाताशी धरून अनेक महिलांना ब्लॅकमेल करून त्यांचे लैंगिक शोषण केल्याचे त्या व्हिडिओ च्या माध्यमातून दिसत आहे, आता सोज्वळ भाजपा त्याच्यावर काय कारवाई करणार? काय त्याला पाठीशी घालणार? सोमय्याने राज्यातील अनेक मोठमोठ्या नेत्यांचे भ्रष्टाचार बाहेर काढण्याच्या नावाखाली भाजपात भरती करून घेतले आहे आता भाजप फुल्ल झाली आहे म्हणून सोमयाला अभय देणार का जर का सोमयावर कारवाई करून त्याला अटक झाली नाही तर यापुढे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल असे यादव बोलताना म्हणाले.
यावेळी उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट, उपजिल्हा समन्वयक विक्रम चौगुले, उंचगाव प्रमुख दीपक रेडेकर यांनीही भाजपवर निशाणा साधत किरीट सोमयावर कारवाई करून त्याला जेलमध्ये टाकण्याची मागणी केली, भर पावसात शिवसैनिक व महिलांनी मोठमोठ्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला, यावेळी किरीट सोमय्या व भाजपच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनात करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट, उंचगावचे उपसरपंच विराग करी, उंचगाव गाव प्रमुख दीपक रेडेकर, उपजिल्हा समन्वयक विक्रम चौगुले, युवा सेना तालुकाप्रमुख योगेश लोहार, उपतालुकाप्रमुख राहुल गिरुले, फेरीवाला संघटनेचे तालुकाप्रमुख कैलास जाधव, युवा सेना विभाग प्रमुख सचिन नागटिळक, संगीता आवळे, सुरेखा लोंढे, कमल कोगले, हौसाबाई सोनुले, गांधीनगरचे सुनील पारपाणी, किशोर कामरा, अजित पाटील, अजित चव्हाण, बंडा पाटील, आबा जाधव आधी शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
