लवकरच शेतकऱ्यांना मिळणार 14 वा हप्ता

नवी दिल्ली : पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या लाभार्थी शेतकऱ्यांना 14 व्या हप्त्याची प्रतीक्षा आता जास्त काळ करावी लागणार नाही. कारण याच महिन्यात पात्र शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये 2000 रुपये जमा केले जाणार आहेत.

वर्षभरात तीन वेळा सरकारकडून शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये 2-2 हजार ट्रान्सफर केले जातात. मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 जुलै रोजी 14 व्या हप्त्याचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात ट्रान्सफर करणार आहेत. ज्याचा फायदा सुमारे 9 कोटी शेतकऱ्यांना होईल.ही योजना केंद्र सरकारद्वारे चालवली जाते. ज्याद्वारे पात्र शेतकऱ्यांना एका वर्षात तीन हप्त्यांमध्ये 2-2 हजार रुपये दिले जात आहेत. म्हणजेच पात्र शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपयांची आर्थिक मदत मिळतेय. यावेळी 14 वा हप्ता जारी केला जाणार आहे.

🤙 8080365706