झोपताना जाड उशी वापरण्याचे तोटे…

झोपताना डोक्याखाली जास्त जाड उशी घेतल्याने अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. तर जाणून घेऊया झोपताना डोक्याखाली जाड उशी घेण्याचे तोटे.

मानदुखी: झोपताना जाड उशी लावल्याने मान दुखू शकते. या वेदनामुळे तुमची दैनंदिन कामे कठीण आणि विस्कळीत होऊ शकतात. जर तुम्हाला मानदुखीच्या समस्येचा सामना करायचा नसेल तर नेहमी पातळ आणि मऊ उशीचाच वापर करावा.

पाठीचा कणा दुखणे:जाड उशी लावल्याने मणक्याचे दुखणे देखील होऊ शकते. कारण जाड उशा मणक्याला वळण देण्याचे काम करतात. त्यामुळे तुमचा रोजचा दिनक्रम बिघडू शकतो.

रक्ताभिसरण: जाड उशी लावल्याने डोके उंच होते, त्यामुळे कवटीत रक्ताभिसरण नीट होत नाही. एवढेच नाही तर केसांनादेखील योग्यप्रमाणात पोषण मिळत नाही.

🤙 8080365706