विरोधकांची एकच विचारधारा आणि ‘कुटुंब वाचवा; पंतप्रधान मोदी

दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पोर्ट ब्लेअरमधील वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी विरोधी पक्षांवर भ्रष्टाचार आणि कुटुंबवादाचा आरोप केला. विरोधकांची एकच विचारधारा आणि ‘कुटुंब वाचवा, कुटुंबासाठी भ्रष्टाचार वाढवा’ असा अजेंडा असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, काही पक्षांच्या स्वार्थी राजकारणामुळे भारतातील विकासाची व्याप्ती देशाच्या दूरवरच्या भागात पोहोचू शकली नाही. हे पक्ष त्या कामांना प्राधान्य द्यायचे, ज्यात स्वत:चे आणि कुटुंबाचे भले आहे, त्याचा परिणाम असा झाला की, आदिवासी पाडे आणि बेटावरील जनता विकासापासून वंचित राहिली.

🤙 8080365706