
कोल्हापूर : आज १८ जुलै रोजी अण्णा भाऊ साठे पुण्यतिथी निमित्त इंदुमती वसतिगृहात सर्व अनुदानित वसतिगृह अधिक्षकांची कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यशाळेत आदर्श वसतिगृहाची संकल्पना त्या साठी करावयाची कार्यवाही या बाबत जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे व समाज कल्याण निरीक्षक सदानंद बगाडे यांनी मार्गदर्शन केले.
तत्पूर्वी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अण्णा भाऊ साठे यांचे बाबतीत त्यांच्या कार्याची महती तालुका समन्वयक आशा रावण यांनी उपस्थितांना दिली.सदर कार्यशाळेस जिल्ह्यातील सर्व अधीक्षक उपस्थित होते.
