आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रयत्नांतून ३ रुग्णाना ‘मुख्यमंत्री सहाय्यता’मधून अडीच लाखांची मदत

कोल्हापूर: कोल्हापूर दक्षिण मतदार संघाचे आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रयत्नातून लहान बाळासह तीन रुग्णांच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अडीच लाखांचे अर्थसहाय्य मंजूर झाले आहे. आमदार ऋतुराज पाटील यांनी या तिन्ही रुग्णांच्या नातेवाईकाना अर्थसहाय्य मंजुरीची पत्रे दिली.

मयुरी गौरव कात्रे यांच्या लहान बाळावर उपचार सुरु आहेत. या उपचारांसाठी आर्थिक मदतीची गरज असल्याचे समजताच आमदार ऋतुराज पाटील यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळावी यासाठी पाठपुरावा केला होता. त्यानुसार मुख्यमंत्री सचिवालयाकडून ५० हजार रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर झाले आहे. त्याचबरोबर मेंदू विकारावर उपचार घेत असलेल्या शोभा अरुण भोसले आणि कर्करोगावर उपचार घेत असलेल्या रामचंद्र देवाप्पा मगदूम यांच्या उपचारासाठी प्रत्येकी १ लाख रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे. आमदार ऋतुराज पाटील यांनी या रुग्णाच्या नातेवाईकाकडे उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्य मंजुरीची पत्र सुपूर्द केली. आमदार पाटील यांनी यावेळी रुग्णांच्या प्रकृती माहिती घेतली तसेच ते लवकरात लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा दिल्या.

🤙 8080365706