
कोल्हापूर : जिल्ह्यामध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचे कामकाज सुयोग्य पध्दतीने तसेच कॉपीमुक्त होण्यासाठी परीक्षा केंद्राच्या आवारात, परिसरात इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे.
अपर जिल्हादंडाधिकारी भगवान कांबळे यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड १९७३ मधील कलम १४४ अन्वये परीक्षा केंद्रांच्या / उपकेंद्रांच्या १०० मीटर परिसरात दि.१८ जुलै ते ८ ऑगस्ट २०२३ या कालावधीत (ज्या दिवशी परीक्षा पेपर नसतील ते दिवस वगळून) दररोज सकाळी ७ वाजल्यापासून ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत बंदी आदेश जारी केला आहे.

परीक्षा केंद्राच्या आवारात, परिसरात मोबाईल फोन व त्या संबंधी इलेक्ट्रॉनिक साहित्य बाळगण्यास किंवा वापरण्यास, झेरॉक्स मशिन, फॅक्स मशिन व लॅपटॉप यांचा वापर करण्यास बंदी घातली आहे.
