
मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत कथित व्हायरल व्हिडिओ प्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली आहे. मी कोणत्याही महिलेवर अत्याचार केलेला नाही, व्हिडिओची सत्यता तपासून घ्यावी अशी विनंती किरीट सोमय्या यांनी केली आहे.

महाराष्ट्राचे भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचा दावा केला जात आहे. हा व्हिडिओ एका मराठी वृत्त वाहिनीने समोर आणला आहे. अशा प्रकारचा व्हिडिओ त्यांच्या हाती असल्याचा दावा हे चॅनल करत आहे, ज्यामध्ये किरीट सोमय्या आक्षेपार्ह अवस्थेत दिसत आहेत. दरम्यान या प्रकरणी आता किरीट सोमय्या यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीलं आहे. माझ्याकडून कोणत्याही महिलेवर असा अत्याचार झालेला नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.
