आझाद मैदानावर विशाल मोर्चा: राजू शेट्टी

कोल्हापूर : देशातील गोरगरीबांच्या जमिनी हिसकावून घेऊन अतिक्रमणाच्या नावाखाली त्यांना भूमिहीन करण्याचा डाव सरकारने आखलेला आहे. एकाही अतिक्रमण धारकाची जमिन आम्ही जाऊ देणार नाही. गायरान, गावठाण व वन विभागातील जमिनीवरील अतिक्रमणे कराव्यात, या मागणीसाठी दि. १९ जुलै रोजी मुंबईतील आझाद मैदान ते विधानभवन असा प्रागतिक पक्षांच्या सर्व घटक पक्षांच्या वतीने विशाल मोर्चा आयोजित केला असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिली.

ते म्हणाले की, देशात व महाराष्ट्रात स्वातंत्र्यपूर्व कालखंडापासून करोडो-लाखो गरीब लोक हे भूमिहिन असून इंग्रज सरकारने, हैद्राबाद नवाबाने सुध्दा गोरगरीब लोकांना सरकारी जमिनी, बतने, इनाम सोबतच दिलेल्या होत्या तेच लोक आज अतिक्रमणधारक महाराष्ट्र सरकारने ठरविले आहेत. तर दुसन्या बाजूला महाराष्ट्रासारख्या छत्रपती शिवराय, फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात जवळपास साडेपाच लाख कुटूंबे ही स्वतःच्या राहत्या घराच्या व वहिवाटी शेतीच्या मालकीपासून कोसो मिल दूर असल्यामुळे सध्या राज्यातील लाखो गोरगरीब भुमिहिनांना अतिक्रमणधारक ठरवून, न्यायालय निर्णयनावाने बेदखल करून पुन्हा या जमिनी धनदांडग्यांच्या घशात घालण्याचे सरकारी षडयंत्राचा, आम्ही तीव्र निषेध करतो त्याचबरोबर पहिल्यांदा धनदांडग्याची, सरकारी जमिनीवरील अतिक्रमणे शासनाने हटवावीत, भूमिहिनांच्या घर व वहिवाटी शेतीहक्काचे संरक्षण करावे, गावरान, गावठाण, वनविभाग जमिनिवरील पिढयानपिढ्या वर्षांनुवर्षे राहते घर व शेती करून पोट भरणाऱ्या भुमिहिनांना जमीन वाटप व्हावे, त्या जमिनिचा सातबारा त्यांच्या नावे व्हावा या प्रमुख मागण्यांसाठी राज्यातील गायरान व सरकारी जमिनीवरील अतिक्रमणधारक संघटना राज्यभर एकत्रीत आले असून भूमि अधिकार मोर्चा महाराष्ट्र राज्य या बॅनरखाली राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी गायरान प्रश्नांवर धरणे प्रदर्शने, स्थानिक मोर्चे काढल्यानंतर दिनांक – १९ जुलै २०२३ रोजी दुपारी १२ वाजता हा विशाल मोर्चा आझाद मैदानात होणार असून या मोर्चाला राज्यात प्रागतिक पक्षांच्या सर्व घटक पक्षांनी म्हणजे बी. आर. एस.पी. सी.पी.आय, सी.पी.आय. (एम.), शेकाप, स्वाभिमानी पक्ष, जनता दल (सेक्युलर) समाजवादी पार्टी, आर.पी.आय. (सेक्युलर), एकलव्य सेना, लाल निशान पक्ष, बहुजन विकास आघाडी, सी.पी.आय. (एम.एल) सत्यशोधक कम्यूनिस्ट पार्टी या पक्षांनी सक्रीय पाठींबा जाहीर केलेला असून पक्षकार्यकर्ते सुध्दा मोठया संख्येने या मोर्चात सामिल होणार आहेत व या पक्षाचे आमदार देखील या प्रश्नांला विधानसभेत वाचा फोडणार आहेत. राज्यातील सर्व अतिक्रमण धारकांनी १९ जुलै रोजी हक्काच्या लढाईसाठी मुंबईतील आझाद मैदानावर हजर रहावे, असे आवाहन शेट्टी यांनी केले आहे.

🤙 8080365706