अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सर्व बंडखोर आमदार शरद पवार यांच्या भेटीला…..

मुंबई : आज पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सर्व बंडखोर आमदार राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत.

शरद पवार थोड्याच वेळात यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये येणार आहेत. यावेळी पवार या आमदारांशी संवाद साधणार असून या भेटीत काय चर्चा होते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली हे सर्व बंडखोर आमदार मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण सेंटरवर आलं आहे. यात छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, अनिल पाटील आणि इतर आमदार शरद पवार यांच्या भेटीसाठी आले आहेत. शरद पवार हे सिल्व्हर ओकवर आहेत. तिथून ते वायबी चव्हाण सेंटरला निघाले आहेत. तर जितेंद्र आव्हाड हे चव्हाण सेंटरला पोहोचत आहेत. जयंत पाटीलही चव्हाण सेंटरकडे यायला निघाले असल्याचं सांगितलं जात आहे.

🤙 8080365706