अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेस आणि ठाकरे गटाचे आमदार आक्रमक

मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेस आणि ठाकरे गटाचे आमदार आक्रमक झाले आहेत. सरकारविरोधात विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्यात आले.

आमदारांकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. खोके सरकार हाय हाय अशी जोरदार घोषणाबाजी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांकडून करण्यात आली. मात्र या आंदोलनाला राष्ट्रवादीच्या आमदारांनी दांडी मारली. एकही आमदार या आंदोलनात सहभागी झाला नसल्यानं चर्चेला उधाण आलं आहे.काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंडखोरी करत आठ नेत्यांसह मंत्रिपदाची शपथ घेतली. या सर्व पार्श्वभूमीवर या अधिवेशनाला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. राष्ट्रवादीचे आमदार काय भूमिका घेणार याकडे आता राज्याचं लक्ष लागलं आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाकडून जोरदार आंदोलन करण्यात आलं. मात्र या आंदोलनात राष्ट्रवादीचा एकही आमदार सहभागी झाला नाही.

🤙 8080365706