डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चर ला ‘आयपीए’ चे संस्था सदस्यत्व

कोल्हापूर: डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्कूल ऑफ आर्किटेक्चरला इंडियन प्लंबिंग असोसिएशन (आयपीए) चे संस्था सदस्यत्व मिळाले आहे.

सदर सदस्यत्वाचे अंतर्गत विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. इंडियन प्लंबिंग असोसिएशन द्वारे बांधकाम क्षेत्रातील प्लंबिंग या संदर्भात विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे. तसेच मासिका द्वारे नवीन तंत्रज्ञान आणि सेवा यांचा लाभ घेता येईल. सेमिनार साईट व्हिजिट आणि कार्यशाळा याद्वारे विद्यार्थ्यांना तज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे.

सदर सभसत्वासाठी इंडियन प्लंबिंग असोसिएशन कोल्हापूर चाप्टरचे चेअरमन किरण जोशी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. विभाग प्रमुख इंद्रजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. पूजा जिरगे आणि प्रा. कृष्णाली पाटील यांनी संयोजन केले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिल कुमार गुप्ता यांचे मार्गदर्शन तर प्राचार्य डॉ. एस डी चेडे आणि रजिस्ट्रार डॉ. लितेश मालदे यांचे सहकार्य लाभले.

🤙 8080365706