बसमध्ये तरुणीचा विनयभंग

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसने प्रवास करणाऱ्या तरुणीचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे.

यानंतर बसमधील सहप्रवाशांना मोठा धक्का बसला. पीएमपी प्रवासी युवतीचा विनयभंग केल्याची घटना पौड रस्त्यावर घडली. या प्रकरणी एकाविरुद्ध वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलाने हा प्रकार केल्याने याची भीषणता अधिकच असल्याचे दिसून येत आहे. दिलेल्या माहितीनुसार, ती एका महाविद्यालयात बारावीचे शिक्षण घेत आहे. खासगी शिकवणीहून ती पीएमपी बसने घरी जाताना तिच्यासोबत हा प्रकार घडला. अचानक घडलेल्या या प्रकाराने ती घाबरली होती. फिर्यादी तरुणी घरी बसने घरी चालली असताना आरोपी तिच्या बाजूला येऊन बसला. त्यानंतर त्यानंतर त्याने अश्लील वर्तन करायला सुरुवात केली.आरोपी एवढ्यावरच थांबला नाही. तरुणी पौड रोस्त्यावरील बस थांब्यावर उतरुन घरी जात असताना त्याने तिचा पाठलाग सुरु केला. यामुळे तरुणीला आणखीनच धक्का बसला.

🤙 8080365706