काँग्रेस हा एक पक्षच आता युतीमध्ये येणं बाकी : बच्चू कडू

मुंबई : आमदार बच्चू कडू यांनी आताही मंत्रिमंडळ विस्तार का लांबला त्यावर भाष्य केलंय. न्यायालयाचा निकाल, अध्यक्षांचा निकाल यामुळे मंत्रिमंडळ विस्तार रखडला असं वाटत होतं. मात्र आता समजलं की राष्ट्रवादीमुळेच मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता. काँग्रेस हा एक पक्षच आता युतीमध्ये येणं बाकी आहे. तोही आला तर काय हरकत आहे?, असं आमदार बच्चू कडू म्हणाले आहेत.

त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.अजितदादा मुख्यमंत्री होतील याला मी हो ही म्हणू शकत नाही आणि नाही सुद्धा म्हणू शकत नाही. राज्याचं राजकारण सध्या अंदाजाच्या पलीकडे गेलं आहे, अशी मिश्किल टिप्पणीही बच्चू कडू यांनी केली आहे.

🤙 8080365706